ना.मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था ही महाराष्ट्र शासनाची कामगार विषयातील पदव्युत्तर शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण या संबंधात कार्य करणारी एकमेव स्वतंत्र संस्था आहे. संस्थेची स्थापना पुर्वीच्या मुंबई राज्यात जुलै, 1947 साली झाली. संस्था स्थापन झाली त्यावेळेस संस्थेचे नांव ‘बॉम्बे लेबर इन्स्टिटयुट’ असे होते. कारखाने अधिनियम,1948 आणि त्या अंतर्गत कामगार कल्याण अधिकारी संदर्भात नियम केल्याने त्यावेळेस प्रशिक्षित कामगार कल्याण अधिका-यांची नितांत उणीव जाणवली. त्यामुळे राज्य शासनाने श्रीमती हंसा मेहता यांच्या अध्यक्षतेखाली सन 1953 मध्ये समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशीनुसार राज्य शासनाने संस्थेस दोन वर्षाचा पूर्णवेळ पदविका अभ्यासक्रम राबविण्यासाठी मान्यता दिली. सन 1959 मध्ये मुंबई विद्यापीठ अधिनियमांतर्गत सदर संस्थेस पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता दिली, व संस्थेचे नामकरण मुंबई लेबर इन्स्टिटयुट असे केले. संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन 1961 मध्ये भारतरत्न श्री.गुलजारीलाल नंदा याच्या शुभहस्ते झाले. सन 1970 मध्ये सदर अभ्यासक्रमास Master Degree चा दर्जा देण्यात आला व त्याचे नामकरण् Master Degree in Labour Welfare करण्यात आले.

कालांतराने जून,1976 मध्ये सदर पदव्युत्तर अभ्यासक्रमास Master of Labour Studies (MLS)असे नांव देण्यात आले. दि.31 मार्च, 1976 पासुन संस्थेचे नामकरण ‘महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था’ असे करण्यात आले. अग्रणी कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कामगार क्षेत्रातील योगदान विचारात घेऊन,महाराष्ट्र शासनाने जुलै,2008 मध्ये संस्थेचे नामकरण महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था ऐवजी कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था असे केले आहे.
आता संस्थेच्या नावात बदल करून मुंबई व नागपूर येथील दोन्ही संस्थांची नांवे फेब्रुवारी,2023 पासून ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था (N.M.Lokhande Maharashtra Institute of Labour Studies) असे करण्यात आले आहे. ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, नागपूर या संस्थेची स्थापना 1971 मध्ये महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेची प्रादेशिक शाखा म्हणून कामगार विभागा अंतर्गत झालेली आहे. सदर संस्था विदर्भ विकासाच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आली आहे.
N M Lokhande Maharashtra Institute of Labour Studies is a post graduate Institute of the State Government under the administrative control of the Department of Labour (GOM). Institute conduct two years professional post-graduate Master’s Degree course in Human Capital Management and Employee Relations (MHCM & ER) affiliated to Mumbai University and Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University respectively at Mumbai and Nagpur campus.
Mode of Examination - online CBT
| Year | Mumbai Campus | Nagpur Campus |
|---|---|---|
| 2023 |
100%
|
97%
|
| 2024 |
100%
|
97%
|
| 2025 |
96%
|
97%
|
| Year | Mumbai and Nagpur Campus | |
|---|---|---|
| 2022-23 | 72 |
72%
|
| 2023-24 | 70 |
70%
|
| 2024-25 | 64 |
64%
|
The Institute has been recognized as a permanent centre for Ph.D. guidance in Labour Studies by the University of Mumbai.
N M Lokhande Maharashtra Institute of Labour Studies Mumbai & Nagpur Sanctioned posts as per Industries Energy, Labour & Mining Department GR dated 12/03/2024
| Group | Mumbai Office | Nagpur Office |
|---|---|---|
| A | 3 | 2 |
| B | 3 | 2 |
| C | 9 | 6 |
| Total | 15 | 10 |